छत्रपती संभाजीनगर 24 जून (प्रतिनिधी)घरातुन गेलेल्या प्रत्येक मुलामागे एका आईची तगमग, एका वडिलांची असहाय्यता आणि एका कुटुंबाचे उद्ध्वस्त झालेले विश्व असते. त्या विश्वाला पुन्हा उभे करण्याचे काम ऑपरेशन शोध -4 च्या माध्यमांतुन छ.संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी या 17 कुटुंबांच्या आयुष्यात केले आहे.
घरातील रिकामी खोली, जेवणाच्या ताटाकडे लागलेली नजर, प्रत्येक फोनच्या रिंगवर वाढणारी धडधड आणि घर सोडुन गेलेल्या लेकराच्या प्रतिक्षेत जागून काढलेली रात्री.. ऑपरेशन शोध -4 ने अशा 17 कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा सूर्य उगवला आहे.
महाराष्ट्र राज्यात अपह्रत बालकांचा शोध घेण्यासाठी दि. 08/6/26 ते दि. 23/06/26 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “ ऑपरेशन शोध -4” मोहिमेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी उल्लेखनीय यश संपादन करत 13 मुली व 04 मुले अशा एकुण 17 बालकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
ही मोहीम केवळ अपह्रत मुले-मुली यांचा शोध घेण्यापुरती मर्यादित नव्हती, तर तुटलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आणण्याची, पालकांच्या डोळयांतील अश्रुंना आनंदाश्रूंमध्ये बदलण्याची आणि हरवलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्याची संवेदनशील जबाबदारी होती.
यामोहिमे दरम्यान पोलीसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, इतर जिल्हयांतील पोलिसांशी समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा, रेल्व स्टेशन, बसस्थानके, गर्दीची ठिकाणे सोशलमिडीया अकाऊंट्स, याचा वापर करुन प्रत्येक धागा तपासला तेव्हा ही मुल सुखरूप शोधण्यात पोलीसांना यश आले आहे.
या 17 बालकांपैकी 11 मुली प्रेमसंबधांच्या प्रभावामुळे, तर 02 मुलींनी रागाच्या भरात घर सोडले होते. 03 मुलांनी मोठे शहर पाहण्याच्या आकर्षणातून घराबाहेर पडली होती, तर 01 मुलगा आई-वडिलांमधील सततच्या वादामुळे मानसिकदृष्टया त्रस्त होऊन घर सोडून गेला होता.
ऑपरेशन शोध -4 दरम्यान अनेक प्रकरणात पोलिसांना आढळुन आले की, क्षणिक आकर्षण आणि आभासी जगातील खोटया स्वप्नांच्या प्रभावामुळे भुलथापांना बळी पडुन त्यांनी घर सोडले होते.
या मोहिमे दरम्यान प्रेमाच्या नावाखाली भुलथापांना बळी पडणा-या 11 मुली निष्पन्न झाल्या आहेत. सोशल मिडीया, मोबाईल वरील सतत संपर्क, भावनिक आधाराचे आश्वासन आणि वास्तवापासुन दूर असलेली आभासी नाती यामुळे अनेक अल्पवयीन मुली भावनिकदृष्टया प्रभावित होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुरूवातीला प्रेम, काळजी, आणि साथ देण्याची गोड आश्वासने दिली गेली
यामध्ये पोलीसांना संवेदनशिलपणे हाताळताना खालिल प्रकरणे प्रकर्षाने समोर आली आहेत.
1) इंस्टाग्राम आभासी दुनियेत हरवलेली मुलगी पुण्यातून शोधली ..
पोलीस ठाणे चिकलठाणा हद्यीतील 17 वर्षीय मुलगी सोशल मीडियावर विशेषत: इंस्टाग्राम सक्रिय होती. आभासी जगातील आकर्षण आणि वास्तव आयुष्याविषयी निर्माण झालेल्या चुकीच्या समजुती, तसेच उच्चभ्रु राहणीमानाकडे अधिक आकर्षण यातही घरातील शिस्त यामुळे रागाच्या भरात तिने दि. 29/05/26 रोजी घर सोडले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटसची तपासणी केली तिच्या संपर्कातील व्यक्तींची कसोशिने चौकशी केली असता एका सूक्ष्म धाग्याने तपासाला दिशा मिळाली आणि ती पुण्यातील एका मैत्रिणीकडे असल्याची माहिती मिळाली. तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आल्या नंतर समुपदेशनादरम्यान तिला डिजिटल जग आणि वास्तव आयुष्य यातील फरक समजावून सांगण्यात आला व तिला सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
2) आई- वडिलांच्या सततच्या भांडणांना कंटाळून घर सोडलेला मुलगा ..
पोलीस ठाणे करमाड ठाण्याच्या हद्यीतील 14 वर्षीय मुलगा घरातील सततच्या कौटुंबिक वादामुळे मानसिकदृष्टया त्रस्त झाला होता. आई- वडिल यांच्या सततच्या भांडणांना कंटाळून त्याने कोणालाही न सांगता दि. 17/06/26 रोजी घर सोडले होते.
पोलीसांनी सातत्याने शोध घेत विविध बसस्थानके, रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी तपास केला अखेर दि. 21/06/26 रोजी तो मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात अणवानी फिरतांना आढळुन आला. याप्रसंगी त्याच्या आई- वडिलांचे मतपरिवर्तन करण्यात येवुन मुलांचे समुपदेशन करुन त्याला कुटुंबाच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
3) अभ्यासाच्या तणावातून घर सोडलेली मुलगी …
शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्यीतील 17 वर्षीय मुलगी अभ्यासाच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर दि. 21/05/26 रोजी घरातून निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयाची चिंता शिगेला पोहोचली होती. पोलीसांनी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवून नातेवाईक, मित्रपरिवार आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली तेव्हा ती तिच्या नातेवाईकांकडे सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले. समुपदेशनानंतर तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अभ्यासाच्या तणावातून तीने घर सोडल्याचे निष्पन्न झाले आहे.
4) “ मुंबई पाहायची होती ” आणि तीन मित्र घरातुन निघाले ..
शिऊर हद्यीतील 15 ते 16 वयोगटातील तीन मुले मुंबई शहर पाहण्याच्या उत्सुकतेतून घरातून निघून गेली होती. त्यांच्यासाठी हा साहसाचा प्रवास होता, मात्र त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग होता.
पोलीसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू करून रेल्वेमार्ग स्थानके, अनेक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले आणि अखेर दादर रेल्वे स्थानक परिसरातुन या तिघांचा शोध घेण्यात आला. त्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
याप्रसंगी मा. प्रकाश जाधव पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, घरातुन गेलेला प्रत्येक मुल हे पुन्हा आई- वडिलांच्या कुशीत परत आणणे हा आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद असतो. ऑपरेशन शोध -4 मध्ये मिळालेले यश म्हणजे 17 कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आनंद, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम आहे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधवा, त्यांच्या भावनिक बदलांकडे लक्ष द्यावे, मित्र परिवार व सोशल मीडिया वापराबाबत जागरूक राहावे आणि कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
नमुद कारवाई ही मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सरला गाडेकर, वैभव रणखांब, समाधान पवार, पो.उप.नि. गणेश काळे, मनोज पाटील, सचिन क्षिरसागर, विश्वजित फरताडे, ज्ञानेश्वर कांयदे, दगडु तडवी, दिपक पारधे, विनोद भालेराव, स्वप्निल नरवडे, गणेश वाघ, मनेश जाधव, पोलीस अंमलदार शरद पवार, जाकेर शेख, कपिल बनकर, भाग्यश्री चव्हाण यांनी केली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
ऑपरेशन शोध -4 अंतर्गत 17 लेकरं सुखरूप कुटुंबात परतली.. पोलीसांच्या अथक प्रयत्नांनी 17 कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा फुलला आनंद
Related Posts
Add A Comment

