सोयगाव, दि. 24 जून – महाराष्ट्र शासनाच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जिओ-टॅगिंग करून देण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व साक्षीदार यांना सौर कृषी पंप मंजूर झाला होता. या पंपाचा सर्व्हे (जिओ-टॅगिंग) करून देण्यासाठी महावितरणच्या बनोटी शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ विजय अशोक सोनवणे (वय 42) यांनी प्रत्येकी 6 हजार रुपये, असे एकूण 12 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी 19 जून रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यावेळी आरोपीने तक्रारदार व साक्षीदार यांच्याकडून एकूण 12 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढे तडजोडीनंतर तक्रारदाराकडून 5 हजार रुपये स्वीकारण्यास आरोपीने तयारी दर्शविली.
यानंतर 23 जून रोजी गोंदेगाव (ता. सोयगाव) येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मात्र कारवाईदरम्यान आरोपीस संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले.
आरोपीच्या अंगझडतीत टेक्नो कंपनीचा एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राजू नागलोत करीत आहेत. पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे व उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 7720891064 वर संपर्क साधावा.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सौर कृषी पंपाच्या जिओ-टॅगिंगसाठी लाच मागणारा महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात
Related Posts
Add A Comment

