फुलंब्री, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फुलंब्री तालुका प्रतिनिधी म्हणून मा. श्री. अनिल भैय्या बोरसे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे फुलंब्री तालुक्याच्या विकासाला तसेच सहकार क्षेत्राला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी विविध राजकीय, सामाजिक, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“मा. श्री. अनिल भैय्या बोरसे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”
– महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक-दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
अनिल भैय्या बोरसे यांची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
Related Posts
Add A Comment

