बिडकीन | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत बिडकीन पोलिसांनी एका युवकास अटक करून त्याच्याकडून धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2.35 वाजता मौजे तोडोली (ता. पैठण) येथे गस्तीदरम्यान एका संशयित व्यक्तीची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे विनापरवाना धारदार शस्त्रे आढळून आली.
कारवाईदरम्यान आरोपीकडून अंदाजे 12 इंच पाते असलेला लोखंडी सुरा व 7 इंच धारदार पाते असलेला स्टीलचा चाकू असा एकूण रु. 1,500 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किशोर नवनाथ ठवे (वय 19, रा. शेवता, ता. पैठण) असे असून त्याच्याविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 428/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)/135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण होण्यास मदत होत असल्याचे पोलिस प्रशासनाने नमूद केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
बिडकीन पोलिसांची धडक कारवाई; अवैध शस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद
Related Posts
Add A Comment

