छत्रपती संभाजीनगर 22 जून:- ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि गोमांसाची विक्री करणाऱ्या टोळ्यांच्या विरोधात एक निर्णायक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबून जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मोहिमेद्वारे गोवंश तस्करांचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.
दिनांक २६ मे ते २१ जून २०२६ या कालावधीत, ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात चोरट्या मार्गांवर कडक नाकाबंदी आणि सुनीयोजित गस्त वाढवून तस्करांवर मोठा कायदेशीर वचक निर्माण केला आहे. या धडक मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी ७३ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोवंश तस्करीसाठी वापरली जाणारी ८ वाहने जप्त करण्यात आली असून, २ चालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यापुढेही जिल्ह्यात अवैध तस्करी रोखण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल .
या अनुषंगाने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘केर्हाळा’ गावजवळील परदेशीवाडी परिसरात काही इसमांनी गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती स.पो.नि. रवींद्र ठाकरे, प्रभारी अधिकारी, सिल्लोड ग्रामीण यांना मिळाली होती. या माहितीची खात्री करून, स.पो.नि. रवींद्र ठाकरे आणि त्यांच्या पथकाने दिनांक २० जून २०२६ रोजी रात्री ९:०० वाजता परदेशीवाडी परिसरात सापळा रचला. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलता व तत्परता दाखवत अंधारात धाड टाकली, त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे २४ गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय स्थितीत, अन्नापाण्याविना बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी तातडीने या २४ जनावरांची सुटका केली असून, त्यांची अंदाजे किंमत ९ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या या जनावरांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळेत हलवण्यात आले आहे.
सदर प्रकरणी अहमद महबूब पठाण आणि अहमद खाँ मोहम्मद खाँ पठाण (दोन्ही रा. केर्हाळा, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (कलम ५, ५अ, ९अ), भारतीय प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० (कलम ११) आणि भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) चे कलम ३(५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (सिल्लोड) श्री. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र ठाकरे, श्री. राजेंद्र बनकर, पो.उप.नि. श्री. अनिल धनुरे व पोलीस अंमलदार अनंत जोशी, दादाराव पवार, संजय आगे, कडुबा भाग्यवंत, रामेश्वर जाधव, सचिन काळे आणि रविकिरण भारती यांच्या पथकाने केली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची गोवंश तस्करांवर धडक कारवाई; २४ जनावरांची सुटका व दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल…
Related Posts
Add A Comment

