पैठण, दि. २२ जून : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने पैठण शहरात दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, संत एकनाथ महाराजांच्या पवित्र नगरीत पावसाने जणू आपल्या आगमनाची सुरुवात नाथांच्या मंदिर परिसरापासूनच केल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत होती. मंदिर परिसरात पावसाच्या सरी कोसळताच वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण झाली. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण शहराला पावसाने आपल्या कवेत घेतले.
अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी लागली. तर काही भागांत पाण्याचा निचरा मंदावल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
दुसरीकडे, शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाच्या आगमनामुळे परिसरातील तापमानात घट झाली असून वातावरण आल्हाददायक बनले आहे.
नाथनगरी पैठणमध्ये पावसाच्या दमदार आगमनाने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी; पैठण शहर जलमय
Related Posts
Add A Comment

