छत्रपती संभाजीनगर, दि. २० जून – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दोडे गुजर समाज मंडळाचे सल्लागार ॲड. संजय पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत समाजाच्या विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी दोडे गुजर समाजाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक मनिलाल (नाना) पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री. नवलसिंगराजे पाटील यांचा सत्कार केला. भेटीदरम्यान समाजातील विद्यार्थी, महिला व कामगार घटकांच्या हितासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोडे गुजर समाजाचे स्वतंत्र वसतिगृह (Hostel) सुरू करण्यासाठी जागेची उपलब्धता, आवश्यक शासकीय सहकार्य तसेच समाजाच्या विविध गरजांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
समाजातील गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध योजना व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, तसेच घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक मदत कशी उपलब्ध करून देता येईल यावरही यावेळी विचारमंथन झाले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन श्री. नवलसिंगराजे पाटील यांनी दिले.
याप्रसंगी संदीप पाटील, हरलाल पाटील, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थित सर्वांनी समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत नवीन पिढीने नेतृत्वाची धुरा स्वीकारावी आणि ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी, असा सकारात्मक संदेश दिला. समाजामध्ये एकोपा, बंधुभाव आणि विकासाची भावना कायम ठेवून कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि गरजू घटकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांना शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि समाजाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करणे हेच आमचे ध्येय आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
– महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
दोडे गुजर समाजाच्या विकासासाठी सकारात्मक चर्चा; वसतिगृह उभारणीसह विविध प्रश्नांवर विचारमंथन
Related Posts
Add A Comment

