Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून NEET परीक्षेसाठी चोख बंदोबस्त; ड्रोनद्वारे होणार निगराणी
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून NEET परीक्षेसाठी चोख बंदोबस्त; ड्रोनद्वारे होणार निगराणी

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 20 जून – राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) 2026 च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था उभारली असून परीक्षेच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनासाठी व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळी प्रथमच ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने केंद्रांवर विशेष निगराणी ठेवली जाणार आहे.
दि. 21 जून रोजी देशभरात होणाऱ्या NEET परीक्षेसाठी ग्रामीण हद्दीतील तीन परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कन्नड येथील संत तुकाराम महाविद्यालय, फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच डोंगरगाव कवाड येथील राजर्षी शाहू आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज या केंद्रांचा समावेश आहे. या तिन्ही केंद्रांवर एकूण 1,272 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व परीक्षा केंद्रांवरील बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ब्रीफिंग घेण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्बशोधक व नाशक पथकाने (BDDS) सर्व केंद्रांची तपासणी करून परिसर सुरक्षित घोषित केला आहे.
परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परीक्षेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याने परीक्षेची गोपनीयता व शिस्त अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “NEET परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण पोलीस दल विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी आणि आपले संपूर्ण लक्ष अभ्यास व पेपर सोडवण्यावर केंद्रित करावे.”
परीक्षेच्या यशस्वी व सुरळीत आयोजनासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.