वैजापूर, दि. 20 जून – वैजापूर-शिर्डी महामार्गालगत बेलगाव शिवारात राजस्थानमधील मजूर सिताराम सज्जनलाल बावरी (वय 30) याची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात राहुल ऊर्फ कुणाल कुंभारकर (18) व ऋषिकेश ऊर्फ सोनू त्रिभुवन (23) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी लुटीच्या उद्देशाने सिताराम बावरी यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर बेलगाव शिवारातील पडीत जमिनीत नेऊन लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली. मृताची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळल्याची कबुली आरोपींनी दिली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व त्यांच्या पथकाने केली.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वैजापूरमध्ये राजस्थानच्या मजुराची हत्या; दोन आरोपी जेरबंद
Related Posts
Add A Comment

