छत्रपती संभाजीनगर, दि. 19 जून 2026 – राज्यातील अमली पदार्थांच्या अवैध विक्री, वाहतूक व वितरणाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई करत गुजरातमधील एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे राज्यात नशेच्या गोळ्या आणि प्रतिबंधित औषधांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश झाला आहे.
यापूर्वी छावणी आणि वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व कोडीनयुक्त कफ सिरप जप्त केले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 19 लाख 53 हजार 298 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. जप्त केलेल्या साहित्यामध्ये Nitrazepam गोळ्या, AADPAM-10 गोळ्या, Kaimodin-T आणि R-COFF-CT कफ सिरप यांचा समावेश आहे.
या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरत येथे छापा टाकून इस्म मुन्नाफ इक्बाल शेख (वय 40) याला ताब्यात घेतले. तो गुजरातमधील फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योती प्रियदर्शिनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलिस अधीक्षक अजित टेके, पोलिस उपअधीक्षक साईनाथ डोंबे तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
अंमली पदार्थांची तस्करी, विक्री अथवा वाहतूक करणाऱ्यांविषयी माहिती असल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
“नशामुक्त महाराष्ट्र” मोहिमेला गती देत अमली पदार्थांच्या साखळीवर प्रहार करण्यासाठी टास्क फोर्सकडून सातत्याने कारवाया सुरू असून, राज्यातील तरुणांना व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गुजरातमधून राज्यात नशेच्या गोळ्या व औषधांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी जेरबंद
Related Posts
Add A Comment

