छत्रपती संभाजी नगर- महानगरपालिका अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय मिटमिटा येथे आज सकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी अचानक भेट दिली.
व दहावीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना नवीन शाळेत स्थलांतर कधी होणार असे विचारले असता लवकरच नवीन शाळेमध्ये मनपा मीटमिटा विद्यालय स्थलांतर होईल असे आयुक्तांनी सांगितले.
मनपाची माध्यमिक विद्यालय मीटमिटा ही शाळा रस्ता रुंदीकरणांमध्ये जाणार असल्यामुळे शहरातील उद्योजक जुगल किशोर तापडिया यांनी मनपा परिसरामध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या तीन एकर जमिनीवर सुसज्ज इमारत बांधून दिली आहे.
किरकोळ कामे बाकी असल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतर होईल असे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ननावरे यांनी सांगितले.
या नवीन इमारतीच्या बांधकाम झाल्यामुळे शाळेमध्ये परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतला आहे.
मागील शैक्षणिक वर्षात 500 विद्यार्थी या शाळेत प्रवेशित होते.
नवीन इमारत व शाळेमध्ये असलेल्या सर्व सुविधा बघून परिसरातील पालकांनी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे आज पर्यंत साडेसहाशे विद्यार्थी प्रवेशित झालेले आहे.
व दररोज प्रवेशासाठी पालकांची गर्दी होत आहे.
याप्रसंगी आयुक्तांनी परिसरातील पालकांशी संवाद साधून शाळेच्या गुणवत्तेबद्दल आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मनपा मिटमिटा शाळेत आयुक्त अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला….जुलै महिन्यात नवीन इमारतीत स्थलांतर
Related Posts
Add A Comment

