छत्रपती संभाजीनगर:खासगी शिकवणीचा (ट्युशन) कोणताही आधार न घेता, केवळ स्व-अभ्यासाच्या (सेल्फ-स्टडी) जोरावर १० वी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या महानगरपालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘जायन्ट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर’तर्फे नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. हॉटेल रेड वेलव्हेट येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
या प्रेरणादायी सोहळ्याला मनपाचे शिक्षण उपायुक्त श्री. पांढरे सर, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी रईसा बेगम खान मॅडम यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्रुपचे सन्माननीय सदस्य व मुख्य प्रायोजक श्री. केशवभाई पटेल यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारी उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, अंधत्वावर मात करत ८०.६०% मिळवणाऱ्या सिडको एन-७ मनपा शाळेतील कु. तनुजा रगडे या दृष्टीहीन विद्यार्थिनीचा विशेष रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
या संपूर्ण प्रकल्पाचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन माजी अध्यक्षा व प्रकल्प प्रमुख सौ. पूजा विठोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. देवेंद्र शेठ, प्रशासन संचालक (DOA) श्री. विष्णू राऊत आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जायन्ट्स ग्रुपतर्फे मनपा शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; ‘सेल्फ-स्टडी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक
Related Posts
Add A Comment

