खुलताबाद, प्रतिनिधी : खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पावर मासेमारी हक्काच्या वादातून दोन गटांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांना शांततेचे आवाहन करत पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
गिरजा धरण परिसरातील मासेमारी हक्कावरून निर्माण झालेला वाद वाढू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांशी चर्चा केली. अखेर दोन्ही बाजूंमध्ये यशस्वी समझोता घडवून आणण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे परिसरातील तणाव निवळला असून परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी खुलताबाद पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले असून, शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
येसगावमध्ये मासेमारी हक्कावरून दोन गट आमनेसामने; खुलताबाद पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
Related Posts
Add A Comment

