छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (प्रतिनिधी): शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सुचना प्रौद्योगीकी संस्थान (NIELIT) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ जून २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील पंडित दीनदयाल उपाध्याय NIELIT केंद्र येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांसाठी २०७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा कार्यालयाचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या गरजा ओळखून तरुणांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध कौशल्य विकास व उद्योजकता योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भुजंग रिठे आणि सुरेश बहुरे यांनीही उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहित केले.
रोजगार मेळाव्यास ५४७ इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली होती. विविध आस्थापनांकडून ७६६ मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर २०७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक नामांकित नियोक्त्यांनी सहभाग नोंदवत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तसेच उपलब्ध रिक्त पदांची माहिती दिली. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी NIELIT चे अधिष्ठाता अश्वनी कुमार टिक्कू, प्लेसमेंट अधिकारी सौरभ बनसोड, असिस्टंट प्रोफेसर योगेश शेजवळ तसेच कौशल्य विकास विभागाचे विरेंद्र चव्हाण, रामदास फुले, प्रविण डोंगरदिवे, शिवप्रसाद चिंचोले, प्रितम सोनवणे, अखिलेश इंगळे, विशाल वाघमारे आणि आदित्य चोपडे यांनी विशेष सहकार्य केले.
— महाराष्ट्र न्यूज टाईम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
रोजगार मेळाव्यातून २०७ उमेदवारांची निवड
Related Posts
Add A Comment

