छत्रपती संभाजीनगर दि.१७ जून
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निम्मित अभिवादन करण्यात आले.
सिडको कॅनॉट येथील महाराणा प्रताप यांच्या अर्ध आकृती पुतळ्यास मा.स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्री. शिवाजी दांडगे,गणेश नावंदर,नगरसेविका श्रीमती सुनीता सोळुंके,दया गायकवाड,मुख्य उद्यान अधिक्षक विजय पाटील,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, रविंद्र खरात,संतोष कोठाळे, करण साळवे ,जयंती समितीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते नागरिक आदींची उपस्थिती होती.
*पुतळा परिसरात ध्वज स्तंभ व हाय मास्ट*
महाराणा प्रताप यांना अभिवादन करण्यात आल्या नंतर मा.सभापती यांनी पुतळा परिसराची पाहणी केली. यावेळी अभिवादनासाठी उपस्थित असलेल्या महाराणा प्रताप जयंती समितीचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ध्वज स्तंभ व हाय मास्ट लावण्याचे मागणी केली.या नुसार मा.सभापती यांनी या बाबत संबंधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निम्मित अभिवादन
Related Posts
Add A Comment

