छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व अंगीकृत सेना पदाधिकाऱ्यांचा “नवसंकल्प मेळावा” गुरुवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात होणार असून, मनसे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारधारेनुसार संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय दिशा आणि पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत सेना पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मनसेचा जिल्हा पदाधिकारी नवसंकल्प मेळावा 18 जून रोजी
Related Posts
Add A Comment

