छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकरण सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विशेष मनाई आदेश जारी केले आहेत.
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 च्या कलम 163(1)(3) अंतर्गत हा आदेश काढला आहे. आदेशानुसार, मतमोजणीचे स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र असलेल्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे आणि त्याच्या 200 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रिया 22 जून 2026 रोजी सकाळी 6.00 वाजल्यापासून ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार असून, निवडणूक आयोगाने अधिकृत केलेले कर्मचारी, उमेदवार आणि अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, मतमोजणी शांततेत आणि सुरळीत पार पडावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हा मनाई आदेश 18 जून 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजल्यापासून 22 जून 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाईम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर : मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश लागू
Related Posts
Add A Comment

