वेरूळ | प्रतिनिधी
वेरूळ येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत शिक्षक सुरेश रुपचंद बोरसे यांचा झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारा ठरला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असली तरी त्यांची जामिनावर सुटका झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचारी नागरगोजे यांनाही अटक करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम काळे यांनी आज वेरूळ येथे जाऊन दिवंगत बोरसे सरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.
कुटुंबीयांशी संवाद साधताना आमदार काळे यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच बोरसे सरांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व दोन मुलींना मिळणाऱ्या शासकीय लाभांसह पेन्शनची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार विक्रम काळे यांच्यासमवेत विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते साईनाथ जाधव यांनी देखील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, “बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामुळे वेरूळची ओळख शांतताप्रिय आणि सांस्कृतिक शहर म्हणून आहे. आजपर्यंत अशा प्रकारची दुर्दैवी घटना येथे कधीही घडली नव्हती. बोरसे सरांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”
दिवंगत सुरेश बोरसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील केली.
– महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वेरूळ येथील दिवंगत शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबीयांची आमदार विक्रम काळे यांची भेट
Related Posts
Add A Comment

