छत्रपती संभाजीनगर, दि. 18 जून 2026 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मतदान दि. 19 जून 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात मतदान केंद्र राहणार आहे.
मतदान प्रक्रियेसाठी नागरिकांची व वाहनांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार काही मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
चांदणे चौक – अप्पणगाव साठे चौक – उड्डाणपूल पाटील चौक – सर्वोदया हॉस्पिटल चौक या मार्गावरून येणारी वाहने एन-12 गणपती विसर्जन विहीर मार्गे वळविण्यात येतील.
चांदणे चौक – कॅनॉट प्लेस – चेतनपुरा चौक – विभागीय आयुक्त निवासस्थान या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्था अधिकारी मार्गांमध्ये बदल करू शकतील.
मतदान प्रक्रियेच्या सुरळीत आयोजनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाईम्स
प्रतिनिधी : दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल
Related Posts
Add A Comment

