खुलताबाद, (प्रतिनिधी एस. के. शेख किनगावकर)
खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरूळ येथील रहिवासी श्री. सुरेश रुपचंद बोरसे (वय ५१), व्यवसाय शिक्षक, रा. कौशिक गल्ली, वेरूळ यांचे दि. ११ जून २०२६ रोजी निधन झाले. या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता सुरेश बोरसे (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात कलम १०६(१) व १३१ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत प्रकाश जाधव यांनी सखोल तपासाचे आदेश दिले असून तपास स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) मार्फत सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत पोलीस उपनिरीक्षक एकनाथ विश्वनाथ नागरगोजे व पोलीस अंमलदार वाल्मिक बनगे हे दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेत दोघांनाही तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले आहे.
दरम्यान, कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपी नागरगोजे हे खुलताबाद पोलीस ठाण्यात एलसीबीच्या ताब्यात आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषी कोणताही असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट व कठोर भूमिका पोलीस अधीक्षकांनी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
संपादक : दिनेश गायके, महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वेरूळ येथील शिक्षक मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित; गुन्हा दाखल
Related Posts
Add A Comment

