छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रोन (MD) पावडरची वाहतूक व विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ६२.२७ ग्रॅम एमडी पावडरसह एकूण ७ लाख ३९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे झाल्टा फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी MH 14 HU 0639 क्रमांकाची कार अडवली. वाहनातील अर्जुन मिटटी साबळकर (रा. पाचोड) व नरेश मांगीलाल बिश्नोई (मूळ रा. राजस्थान, सध्या पाचोड) यांच्याकडून मेफेड्रोन (MD) पावडर, मोबाईल फोन, डिजिटल वजनकाटा व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

