छत्रपती संभाजीनगर, दि. १६ जून : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १६ जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते १८ जूनपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री नगर परिषद क्षेत्र तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व देशी व विदेशी मद्यविक्री दुकाने, बिअर विक्री केंद्रे आणि संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना बंद राहणार आहेत.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले प्रतिनिधी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. उमेदवारांनी प्रचाराची सांगता करत मतदारांशी संपर्क वाढविला आहे.
सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्रांची तयारी, कर्मचारी नियुक्ती आणि निवडणूक साहित्याची उपलब्धता याबाबत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल स्थानिक राजकारणासह राज्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
१८ जून रोजी होणाऱ्या मतदानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान; १६ जूनपासून मद्यविक्री बंद
Related Posts
Add A Comment

