छत्रपती संभाजीनगर, दि.16जुन 2026 — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संवाद कौशल्ये आणि क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शांतिनिकेतन विद्यालयात उभारण्यात आलेल्या STREAM Lab, Communication Lab आणि Cricket Turf चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुलजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान, नवकल्पना आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थी सर्वांगीण प्रगती साधतील तसेच भविष्यात देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संवाद कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित होणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच विद्यालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या असून त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यालयात उभारण्यात आलेले क्रिकेट टर्फ विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देण्यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव कल्याणदादा चव्हाण, मायराज अकॅडमीचे संस्थापक डॉ. मनीष झा, सहसंस्थापिका सौ. सुधा देवराज, अभियंता मनोज चव्हाण, राज्यस्तरीय प्रशिक्षक भाऊसाहेब काकडे, विद्यालयाच्या प्राचार्या मंजुश्री खंडागळे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर जाधव, नगरसेवक योगेश मिसाळ, गजानन नागरे, शालेय समिती अध्यक्ष प्रल्हाद अरसूळ तसेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, तांत्रिक आणि क्रीडा विकासासाठी उचललेले हे पाऊल भविष्यातील सक्षम व कौशल्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शांतिनिकेतन विद्यालयात अत्याधुनिक STREAM Lab, Communication Lab व Cricket Turf चे उद्घाटन
Related Posts
Add A Comment

