छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका तरुणीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणीची ओळख रेणुका शांताराम गांगुर्डे अशी असून त्या शहरातील सुप्रसिद्ध एस. बी. कॉलेजमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेणुका गांगुर्डे या पोलीस भरतीची तयारी देखील करत होत्या. मात्र त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
टीप : आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांच्या तपासानंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
एस. बी. कॉलेजमधील सहशिक्षिकेची गोगाबाबा टेकडी परिसरात आत्महत्या
Related Posts
Add A Comment

