किनगाव, ता. फुलंब्री (एस.के.शेख – प्रतिनिधी) – किनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आदरणीय मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील श्री अतुल चव्हाण साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, पाठ्यपुस्तके व शालेय पोशाखांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी श्री तेजराव चव्हाण, काकासाहेब चव्हाण, नितीन वाघ, डॉ. गायकवाड, माजी सरपंच मनीषाताई चव्हाण, किशोर चव्हाण, प्रशांत चव्हाण, श्रीकांत चव्हाण, योगेश चव्हाण, सचिन चव्हाण तसेच हकीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
किनगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
किनगाव जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
Related Posts
Add A Comment

