छत्रपती संभाजीनगर, दि. १५ जून – पडेगाव येथील पोलीस कॉलनी परिसरात Greenfield International Pre-School च्या नव्या शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्री-स्कूलमधील आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. आधुनिक शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणारे हे शैक्षणिक केंद्र परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा आणि संधी निर्माण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकारी व व्यवस्थापन मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. तसेच संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नगरसेविका कीर्ती शिंदे, संचालक सम्राट घारे, अध्यक्ष माधुरी घारे, मुख्याध्यापिका शर्मिला आर्या, तसेच शिक्षिका आम्रपाली ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उद्घाटन सोहळ्यामुळे पडेगाव परिसरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दर्जेदार पूर्व-प्राथमिक शिक्षणाची नवी दालने खुली झाली आहेत. Greenfield International Pre-School च्या माध्यमातून बालकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाला निश्चितच नवी चालना मिळणार असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पडेगाव येथील पोलीस कॉलनीत Greenfield International Pre-School चे भव्य उद्घाटन
Related Posts
Add A Comment

