छत्रपती संभाजीनगर, दि. 15 जून:
शिवाजीनगर भुयारी मार्ग येथे जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अनेकदा जड वाहने या मार्गातून नेली जात होती. त्यामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या बाबीची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंना गार्डर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे जड वाहनांना भुयारी मार्गातून प्रवेश करणे शक्य होणार नाही.
तथापि, यानंतरही कोणी जड वाहन भुयारी मार्गातून नेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित वाहनचालकाविरुद्ध वाहतूक विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर अभियंता संजय कोंबडे यांनी दिला आहे.
नागरिकांनी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शिवाजीनगर भुयारी मार्गात जड वाहनांना प्रतिबंध; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Related Posts
Add A Comment

