
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ जून –(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळा, सातारा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड मॅडम तसेच सुमित खांबेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, नियमित उपस्थिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे शाळेचा परिसर उत्सवी वातावरणाने फुलून गेला होता.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले. प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करून प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश उत्सव उत्साहात
Related Posts
Add A Comment

