Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणास प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर

श्रमशक्ती व असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणास प्रारंभ

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,दि.१२(प्रतिनिधी)- रोजगार, बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांची अचूक व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण २०२६ तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण २०२६ राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणास आज जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमास सह आयुक्त नियोजन एस.बी. वरसाळे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी नरेंद्र कदम, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, सहा. नियोजन अधिकारी लक्ष्मीकांत थोंटे तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्रमशक्ती सर्वेक्षण

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण अंतर्गत श्रम शक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगारी दर यांसारखे प्रमुख श्रमबाजार निर्देशांक तयार केले जातात. हे निर्देशांक ग्रामीण व शहरी भागांसाठी मासिक, त्रैमासिक तसेच वार्षिकस्तरावर प्रसिद्ध केले जाणार आहेत. याशिवाय, विविध वयोगट, लिंग, शिक्षणाची पातळी, रोजगार स्थिती, उद्योग व व्यवसाय यानुसार सविस्तर आकडेवारी वार्षिक अहवालाद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असंघटीत क्षेत्राचे सर्वेक्षण

तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण असलेल्या असंघटित क्षेत्राची आर्थिक व कार्यात्मक माहिती संकलित करण्यासाठी असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण २०२६ हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रांतील असंघटित, बिगर-कृषी आस्थापनांचा समावेश असेल. या सर्वेक्षणातून रोजगार निर्मिती, उत्पादन, उत्पन्न, व्यवसायाची स्थिती आणि राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.

ही पाहणी ‘महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने आणि अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. या पाहणीचे क्षेत्रीय कामकाज आयपीएसओएस या बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

या सर्वेक्षणातून संकलित केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. तरी सर्वेक्षणास आलेल्या प्रगणकांना सहकार्य करावे. निवडलेल्या कुटुंबांनी व आस्थापनांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.