फुलंब्री, दि. 13 जून 2026 –(एस.के.शेख प्रतिनिधी)फुलंब्री पोलिसांनी पाल फाटा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईलसह एकूण 38 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जून 2026 रोजी दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास पाल फाटा येथील बनसोड गिरणीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही व्यक्ती पत्त्यावर पैसे लावून ‘झन्नामन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
या प्रकरणी किशोर दिलीप प्रधान (रा. फुलंब्री), दीपक पांडुरंग गोरे (रा. पाथरी, ता. फुलंब्री) आणि आकाश देविदास ढोकळे (रा. पाल, ता. फुलंब्री) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 284/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 च्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 38,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार वक्ते करीत आहेत. कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
— एस के शेख
महाराष्ट्र न्यूज टाईम्स | फुलंब्री प्रतिनिधी
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फुलंब्री पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; 38 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Related Posts
Add A Comment

