छत्रपती संभाजीनगर, दि. 13 जून 2026 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा 15 जूनपासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे “शाळा प्रवेशोत्सव-26” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाचा विशेष सहभाग असणार आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी तसेच पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकी वाढविण्यासाठी ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील शाळांना भेट देऊन शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत बालसंरक्षण, आपत्कालीन हेल्पलाईन, वाहतूक नियम, सायबर सुरक्षा आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोलीस हे मित्र म्हणून भेटणार असून, शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शाळांच्या परिसरात नियमित गस्त ठेवण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस अधिक बळ मिळणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान किंवा शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा त्रास, संशयास्पद हालचाल, पाठलाग अथवा अन्य अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असून, ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ या उपक्रमांमुळे विद्यार्थी निर्भयपणे पोलिसांशी संवाद साधू शकतील आणि त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतील.
— महाराष्ट्र न्यूज टाईम्स
प्रतिनिधी: दिनेश गायके, छत्रपती संभाजीनगर.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शाळा प्रवेशोत्सव-26 : पहिल्याच दिवशी ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ करणार विद्यार्थ्यांचे स्वागत
Related Posts
Add A Comment

