Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

June 13, 2026

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»शाळापूर्व तयारी आढावा बैठक संपन्न; प्रवेशोत्सवासाठी मनपाचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर

शाळापूर्व तयारी आढावा बैठक संपन्न; प्रवेशोत्सवासाठी मनपाचे नियोजन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच सुरक्षेलाही प्राधान्य देणार – आयुक्त अमोल येडगे
छत्रपती संभाजीनगर, दि. 12 जून : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 50 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी आणि शाळा प्रवेशोत्सव यशस्वीपणे राबविण्यासाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्याध्यापकांची शाळापूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली.
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा तसेच शाळेचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी 15 जून 2026 रोजी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रत्येक शाळेत महानगरपालिकेचे वर्ग-1 व वर्ग-2 दर्जाचे अधिकारी ‘पालक अधिकारी’ म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 50 अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठकीत आयुक्तांनी मुख्याध्यापकांना प्रवेशोत्सवाचे नियोजन, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढ, शैक्षणिक गुणवत्ता, नियमित उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकीच त्यांची सुरक्षितता देखील महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या तसेच प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार, शिक्षण विस्तार अधिकारी रईसा खान बेगम, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, विजय कोल्हे तसेच सर्व केंद्रीय मुख्याध्यापक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेला वेग, महानगरपालिकेचा नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पुढाकार

June 13, 2026

शंभूनगरात मनपाची धडक कारवाई : १५० मिमी उपजलवाहिनीवरील तब्बल ९६ अनधिकृत नळ जोडण्या खंडित

June 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
कृषी

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : विभागातील तेलबिया व कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी…

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.