Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

June 13, 2026

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण; रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण; रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.११(प्रतिनिधी)- प्रधानमंत्री सेतू या योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन रोजगारक्षम कौशल्य विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगांचा सहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रदीप दुर्गे, उपसंचालक रमण पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आलटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार सत्यभूषण गोसावी आदी उपस्थित होते.

पीएम सेतू ही केंद्र पुरस्कृत योजना असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन त्यांचे आधुनिक, उद्योगाभिमुख व रोजगारक्षम कौशल्य संस्थांमध्ये रुपांतरीत करणे हा उद्देश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि पैठण,गंगापुर, फुलंब्री व खुलताबाद येथील आयटीआय अशा पाच संस्थांचे मिळून एक क्लस्टर विकसित केले जाणार आहे. या पाच आयटीआय मध्ये मिळून शिकणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना या रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचा ३३ टक्के व उद्योगांचा १७ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विकसित करावयाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निवड झाली असून पुढील टप्प्यात उद्योगांचा सहभाग मिळविला जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संयुक्त प्रयत्न केले जातील.उद्योगांशी समन्वय तयार करुन उद्योगांना आवश्यक कौशल्यनुसार रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026

शाळापूर्व तयारी आढावा बैठक संपन्न; प्रवेशोत्सवासाठी मनपाचे नियोजन

June 13, 2026

आयुष्मान भारत कार्ड मोहिमेला वेग, महानगरपालिकेचा नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पुढाकार

June 13, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
कृषी

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJune 13, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : विभागातील तेलबिया व कडधान्य पिकांचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यासाठी…

लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी गोटपॉक्स लसीकरण मोहिम गतिमान करण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसींचे वाटप सुरू

June 13, 2026

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम; ४० संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 13, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.