छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : राज्याचे मंत्री अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगर क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील क्रिकेटला नवी दिशा, आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध होतील, असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीमुळे युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून जिल्ह्यातील क्रिकेट पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी, प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमींनी अतुल सावे यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“छत्रपती संभाजीनगर क्रिकेट विश्वाला सक्षम, दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले असून, क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” अशा भावना अनेक क्रीडाप्रेमींनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक:- दिनेश गायकेपाटील

