छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बीड बायपास रोडवरील भालगाव परिसरातील शिव लॉजिंग येथे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिव लॉजिंग येथे अनैतिक मानवी वाहतुकीसंदर्भात बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून धाड टाकली. कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पोलीस उपअधीक्षक नागरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत एपीआय गाडेकर मॅडम, पीएसआय भालेराव, पीएसआय नरवडे, हेड कॉन्स्टेबल साळवे तसेच महिला अंमलदार साळवी, चारवंडे आणि क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून मानवी तस्करी व अनैतिक व्यवसायांविरोधात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; शिव लॉजिंगवर छापा, दोन महिलांची सुटका
Related Posts
Add A Comment

