फुलंब्री, दि. 10 जून 2026 – अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने मुरूम घेऊन जाणाऱ्या हायवावर फुलंब्री पोलिसांनी कारवाई करत वाहनासह मुरूम जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 271/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी भरत सुखदेव गायकवाड (वय 36) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 जून 2026 रोजी पहाटे 1 वाजेच्या सुमारास नायगाव येथील राहत पार्कसमोर रस्त्यावर तपासणीदरम्यान मोसिन मोईन शेख (वय 26, रा. नायगाव) हा त्याच्या ताब्यातील हायवा वाहनातून विनापरवाना मुरूमाची वाहतूक करताना आढळून आला.
या कारवाईत अंदाजे 5 ब्रास मुरूम (किंमत ₹7,500) तसेच एक निळा-पांढरा रंगाचा हायवा वाहन (किंमत ₹20 लाख) असा एकूण ₹20.07 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक नरके करीत असून, फुलंब्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फुलंब्री पोलिसांची कारवाई : अवैध मुरूम वाहतूक करणारा हायवा जप्त
Related Posts
Add A Comment

