खुलताबाद, दि.10 जून 2026(प्रतिनिधी): जिल्हाधिकारी यांनी आज खुलताबाद तालुक्याचा दौरा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध होणारी मदत तातडीने देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. कृषी, महसूल व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वेरूळ गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. संबंधित विभागांनी लोकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी गावातील विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांचा आढावा घेत कामांच्या गुणवत्तेबाबत आणि वेळेत पूर्णत्वाबाबत सूचना करण्यात आल्या. ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
दौऱ्यावेळी विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जिल्हाधिकाऱ्यांचा खुलताबाद दौरा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलासा; वेरूळमध्ये ग्रामस्थांशी संवाद, विकासकामांची पाहणी
Related Posts
Add A Comment

