छत्रपती संभाजीनगर, दि. १० जून २०२६ –(प्रतिनिधी )
शहरात गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर घटनेची अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी मंत्री झिरवाळ यांनी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देत या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील दोषी व्यक्ती आणि संबंधित गुटखा माफियांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहेत.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रकारच्या दबावतंत्राला शासन अजिबात बळी पडणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात राज्य शासनाने सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा कारवायांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांना आवश्यक संरक्षण आणि सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गुटखा माफियांविरोधातील कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; मंत्री नरहरी झिरवाळ यांची तातडीने दखल
Related Posts
Add A Comment

