छत्रपती संभाजीनगर, दि. 10 जून 2026 – (प्रतिनिधी)
बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितेगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य आणि मोटारसायकली असा एकूण 1 लाख 87 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे 10 जून रोजी दुपारी सुमारे 2.15 वाजता चितेगाव जिल्हा परिषद शाळेमागील जे.एस. टाऊन प्लॉटिंग परिसरातील मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी काही व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून “झन्ना मन्ना” नावाचा जुगार खेळ खेळत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 391/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 6 हजार 720 रुपये रोख रक्कम, चार मोबाईल हँडसेट, जुगाराचे पत्ते आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
सखाराम बाबुराव पवार (रा. चितेगाव)
रत्नाकर सदानंद गायकवाड (रा. विवाहमांडवा)
सलमान नजीर शेख (रा. चितेगाव)
अजय राधाकिसन थोरात (रा. चितेगाव)
प्रदीप आनंद धनराज (रा. चितेगाव)
शेख राजू शेख अयुब (रा. गेवराई शिवार, छत्रपती संभाजीनगर)
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज एकनाथ पाटील यांनी फिर्याद दिली असून, एचसी सोमनाथ जाधव यांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक सोकटकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे, पोहेकॉ वाल्मीक निकम, वाजेद शेख, पोलीस अंमलदार स्वप्नील दिलवाले आणि योगेश वाघमोडे यांच्या पथकाने केली.
बिडकीन पोलिसांनी जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
चितेगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Related Posts
Add A Comment

