छत्रपती संभाजीनगर, दि. 9 जून 2026 – (एस के शेख प्रतिनिधी)
शहरातील मिसारवाडी परिसरात अवैधरीत्या धारदार शस्त्रांची विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत 1 लाख 3 हजार 500 रुपयांचे 66 धारदार शस्त्रे तसेच 30 हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 9 जून रोजी मिसारवाडी येथील गल्ली क्रमांक 7 मध्ये सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 58 मोठ्या आकाराचे चाकू व 8 लोखंडी फायटर अशी एकूण 66 शस्त्रे आढळून आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
समीर खान सलीम खान उर्फ सोनू (वय 26 वर्षे)
मुनावर खान सलीम खान उर्फ लाला (वय 24 वर्षे)
दोघेही रा. गल्ली क्र. 7, मिसारवाडी, छत्रपती संभाजीनगर.
तपासादरम्यान आरोपींकडून हीरो एचएफ डिलक्स (MH-20-FW-0267) ही चोरीची मोटारसायकलही जप्त करण्यात आली. सदर दुचाकी सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी जप्त केलेली शस्त्रे कोठून आणली आणि कोणाला विक्री केली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम व त्यांच्या पथकाने केली. छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोहीम सुरू असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मिसारवाडीत अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 66 धारदार शस्त्रे व चोरीची मोटारसायकल जप्त
Related Posts
Add A Comment

