छत्रपती संभाजीनगर, दि. १० जून २०२६ – मुलाच्या दुर्दैवी खुनाच्या घटनेनंतर शासनाने कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी दिवंगत मनोज आव्हाड यांच्या पत्नी शितल मनोज आव्हाड यांना शासकीय नोकरी दिली होती. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर सुनेने कुटुंबाचा सांभाळ न केल्याचा आरोप करत दिवंगत मनोज आव्हाड यांच्या आई अरुणा शेषराव आव्हाड यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
अरुणा आव्हाड यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे १० जून २०२६ रोजी उपोषणाला सुरुवात केली. शासनाने पुनर्वसनाच्या उद्देशाने दिलेल्या नोकरीचा लाभ संपूर्ण कुटुंबाच्या आधारासाठी व्हावा, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कुटुंबीयांची उपेक्षा होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात संबंधित प्रशासनाने दखल घेऊन न्याय द्यावा तसेच कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या अरुणा आव्हाड यांनी केली आहे.
प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मुलाच्या खुनानंतर पुनर्वसनासाठी नोकरी मिळालेल्या सुनेविरोधात आईचे उपोषण
Related Posts
Add A Comment

