Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»अमृततर्फे ‘मानसमित्र’ समुपदेशकांचे मोफत प्रशिक्षण; १५ ते २२ जूनदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर

अमृततर्फे ‘मानसमित्र’ समुपदेशकांचे मोफत प्रशिक्षण; १५ ते २२ जूनदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत असून पहिल्या बॅचसाठी १५ ते २२ जून २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृतमार्फत हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात येत असून पुणे येथील Maharashtra Institute of Mental Health (MIMH) ही संस्था तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याची ही महत्त्वपूर्ण संधी मानली जात आहे.
प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पालक-शिक्षक समन्वय, मानसिक आरोग्य जनजागृती तसेच शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, मानसमित्र समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, पालक-शिक्षक कार्यशाळा समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समुपदेशन सेवा क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
सहा महिन्यांच्या या प्रशिक्षणात १५ दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे, केस स्टडी, रोल प्ले, मार्गदर्शन व सुपरव्हिजनचा समावेश असेल. प्रशिक्षण ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही स्वरूपात होणार आहे.
पात्रता
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र
एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र
मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW)
डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र
पुण्यात ऑफलाइन प्रशिक्षण
१५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीतील निवास व भोजनाची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांना स्वतः करावी लागणार आहे.
पूर्णपणे मोफत प्रशिक्षण
अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांचा सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत केला जाणार असल्याने हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असून “प्रथम येईल त्यास प्राधान्य” या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. छाननीनंतर पात्र उमेदवारांना ई-मेल किंवा संदेशाद्वारे माहिती देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी
अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर.
संपर्क: 7391065475 / 9403200606

#Amrut #ManasMitra #CounsellingTraining #MentalHealth #ChhatrapatiSambhajinagar #CareerOpportunity #MaharashtraNewsTimes
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.