छत्रपती संभाजीनगर,दि,९.(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ही दि.१४ जून, रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी केली असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण ६४ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर एकूण २०,६६६ उमेदवारांना आयोगाकडून प्रवेश देण्यात आले आहेत. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण २हजार १४३ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आयोगाचे विशेष अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवाराला उपलब्ध करून दिलेल्या प्रवेश पत्रातील नमूद परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहण्याची आणि परीक्षा संबंधित सर्व सूचनाचे पालन करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

