छत्रपती संभाजीनगर, दि. ९ (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत हातमाग विणकर कुटुंबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये नोंदणीकृत हातमाग विणकर कुटुंबांना दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज सवलत देण्यात येणार असून, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांसाठी गणेश उत्सव भत्ता योजना देखील सुरू करण्यात आली आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र व नोंदणीकृत विणकरांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह २५ जून २०२६ पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयात सादर करावेत.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालय, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफर गेट, छत्रपती संभाजीनगर.
योजनेसाठीचा अर्ज नमुना व संबंधित माहिती उपलब्ध आहे. तसेच अर्जाचे नमुने सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयांमध्येही उपलब्ध आहेत.
याबाबतची माहिती उपआयुक्त, वस्त्रोद्योग, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मोफत वीज सवलत व उत्सव भत्ता योजनेसाठी अर्ज मागविले
Related Posts
Add A Comment

