छत्रपती संभाजीनगर, दि. ९ (प्रतिनिधी) – इयत्ता १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यातील एकूण ५,८१९ विद्यार्थी २४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. या परीक्षांच्या नियोजनाबाबत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीस शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, सर्व गटशिक्षणाधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. या दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात इयत्ता १० वीचे २,९२८ विद्यार्थी १४ केंद्रांवर तर इयत्ता १२ वीचे २,८९१ विद्यार्थी १० केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. इयत्ता १० वीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून दरम्यान, तर इयत्ता १२ वीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे.
विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, झूम प्रणालीद्वारे मुख्य नियंत्रण कक्षातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच भरारी पथके, पोलीस बंदोबस्त, मानसिक समुपदेशन आणि सराव सत्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून विद्यार्थ्यांना निर्भय व सुरक्षित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देत विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
इयत्ता १० वी व १२ वी पुरवणी परीक्षा; ५,८१९ विद्यार्थ्यांसाठी २४ केंद्रांवर प्रशासन सज्ज
Related Posts
Add A Comment

