छत्रपती संभाजीनगर, दि. ९ : हरवलेली व बेपत्ता मुले ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने “ऑपरेशन शोध” ही विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत हरवलेल्या, बेवारस अथवा अपहरण झालेल्या मुलांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र आणण्यावर भर देण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कोणतेही हरवलेले, बेवारस किंवा संशयास्पद परिस्थितीत आढळणारे मूल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा अनेतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या एका जागरूक पावलामुळे एखाद्या मुलाचे आयुष्य सुरक्षित होऊ शकते, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
पोस्टरद्वारे “एक पाऊल सहकार्याचे… एका मुलाचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी!” हा संदेश देत मुलांचे संरक्षण, सुरक्षितता आणि पुनर्मिलन हेच आपले ध्येय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
माहितीनुसार, हरवलेल्या अथवा अपहरण झालेल्या मुलांबाबत माहिती मिळाल्यास डायल 112 किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच AHTU छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी व कर्मचारी यांचे संपर्क क्रमांकही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
संपर्क क्रमांक :
सरला गाडेकर (पोलीस निरीक्षक) – 9823808078
विनोद भालेराव (पोलीस उपनिरीक्षक) – 8830036542
स्वप्नील नरवाडे (पोलीस उपनिरीक्षक) – 9158286006
हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस व नागरिक यांचे संयुक्त सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
हरवलेल्या व बेपत्ता मुलांसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची “ऑपरेशन शोध” जनजागृती मोहीम
Related Posts
Add A Comment

