Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला प्राधान्य; कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवसांत अदा करण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर

कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला प्राधान्य; कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवसांत अदा करण्याचे निर्देश

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून : (प्रतिनिधी)महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त तथा प्रशासक अमोल येडगे यांनी प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती व्यवस्थापनापासून ते डिजिटल प्रणालींच्या प्रभावी अंमलबजावणीपर्यंत सर्व विभागप्रमुखांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना हजेरी ॲपचा नियमित, अचूक आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक कर्मचाऱ्याची उपस्थिती वेळेवर नोंदविणे, तिची पडताळणी करणे आणि संबंधित माहिती अद्ययावत ठेवणे ही विभागप्रमुखांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती व कामकाजावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी विभागस्तरावर प्रभावी मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, उपस्थिती नोंदी व विभागीय अभिलेखांची नियमित तपासणी करावी आणि कोणतीही त्रुटी आढळल्यास तत्काळ सुधारणा करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
कामकाजात सातत्याने अनियमितता आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी. तसेच सेवा नोंदी, उपस्थिती आणि विभागीय कामकाजाचा नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यासही त्यांनी सांगितले.
हजेरी ॲपवरील नोंदींची वेळोवेळी पडताळणी करण्यात यावी, प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःची माहिती अद्ययावत ठेवावी आणि विभागप्रमुखांनी त्याची खातरजमा करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले. डिजिटल प्रणालींचा वापर केवळ उपस्थितीपुरता मर्यादित न ठेवता प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रभावीपणे करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवसांत अदा करण्याचे आदेश
बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही चर्चिला गेला. ज्या एजन्सींनी अद्याप कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केलेले नाही, त्यांनी पुढील दोन दिवसांत वेतन अदा करावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
कामगार विभागाने संबंधित एजन्सींना वेळेवर प्रमाणित हजेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून वेतन वितरणात कोणताही विलंब होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या हजेऱ्या वेळेत प्रमाणित करून संबंधित विभागाकडे पाठविणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून, वेळेत प्रमाणित हजेऱ्या न पाठविणाऱ्या विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आवश्यक असल्यास संबंधितांचे वेतन रोखण्याची कारवाईही करण्यात येईल, असा इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.
महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि सेवा वितरणात गती आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
— महाराष्ट्र न्यूज टाईम्स

#BidkinPolice #MaharashtraPolice #PoliceSuccess #MissingPersonCase #DelhiSearchOperation #ChhatrapatiSambhajinagar #PoliceInvestigation #MaharashtraNewsTime #PositiveNews #PoliceWork #ShivRajyabhishek2026 #ChhatrapatiShivajiMaharaj #KrantiChowk #ChhatrapatiSambhajinagar #ShivPremi #MaharashtraNewsTime #DrBalasahebThorat #Swarajya #JaiShivray
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.