Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»शिक्षण विभाग झोपेत? शाळांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर

शिक्षण विभाग झोपेत? शाळांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर,8 जुन|(महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
“शिक्षण हा मूलभूत हक्क आहे की नफेखोरीचा व्यवसाय?” असा सवाल आज अनेक पालकांकडून उपस्थित केला जात आहे. खासगी शाळांकडून आकारण्यात येणारी वाढती फी, महागडी पुस्तके, शालेय गणवेश आणि इतर साहित्य खरेदीसाठी पालकांवर टाकण्यात येणारा आर्थिक बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
अनेक शाळांना शासनाकडून अनुदान मिळत असतानाही विविध शुल्कांच्या नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात असल्याची तक्रार आहे. तर विनाअनुदानित शाळांमध्ये वार्षिक शुल्क ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पालक सांगतात. याशिवाय शाळांकडून विशिष्ट ठिकाणाहूनच पुस्तके आणि गणवेश खरेदी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या साहित्यापेक्षा शाळांकडून सुचविण्यात येणाऱ्या पुस्तकांची व गणवेशांची किंमत दुप्पट-तिप्पट असते. काही शाळा स्वतःच्या प्रकाशनाची पुस्तके वापरत असल्यामुळे ती इतरत्र उपलब्ध होत नाहीत. परिणामी पालकांना शाळेने सांगितलेल्या विक्रेत्याकडूनच साहित्य खरेदी करावे लागते.
नुकत्याच आलेल्या शासन निर्णयानुसार (GR) पालकांना पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य बाहेरून खरेदी करण्याची मुभा आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक पुस्तकांची बाजारात उपलब्धता नसल्याने पालकांना शाळेवरच अवलंबून राहावे लागत आहे. विविध वर्गांच्या पुस्तकांचा खर्च ७ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत जात असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.
अनेक पालकांनी शिक्षण विभागाकडे निवेदने देऊन तक्रारी मांडल्या आहेत. मात्र त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी आणि शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी शाळांच्या शुल्क रचनेचे नियमित लेखापरीक्षण, पुस्तक व गणवेश विक्रीवरील नियंत्रण, तसेच पालकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हा सेवा क्षेत्राचा विषय असून त्याचे व्यापारीकरण रोखण्यासाठी कठोर धोरणे राबविण्याची वेळ आली असल्याचे मत जागृत पालक व समाज जागृतीचे काम करणाऱ्या हिंदवी स्वराज्य संघटनेने व्यक्त केले आहे. या विषयावर प्रशासनाने पालकांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर या विषयाची जनजागृती व निदर्शने करण्याची संघटनेने भूमिका मांडली आहे.
आज महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाचा वाढता खर्च अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विकसित देशांमध्ये शालेय शिक्षण अत्यल्प खर्चात किंवा मोफत उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिक्षण क्षेत्रातील वाढती आर्थिक असमानता, शुल्क नियंत्रणाचा अभाव आणि पालकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक याबाबत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

– महाराष्ट्र न्यूज टाइम्स

#EducationNotBusiness #SchoolFees #ParentRights #EducationReform #MaharashtraEducation #शिक्षण_की_व्यवसाय #पालकांचा_आवाज #शालेय_फी #जनजागृती #MaharashtraNewsTimes
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.