छत्रपती संभाजीनगर, दि. ७ जून २०२६ : पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढीसाठी मिलेनियम पार्क सोसायटीतर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीडबॉल (बीजगोळे) निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सोसायटीतील रहिवासी आणि मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात सुमारे २५ मुले व रहिवाशांनी सहभाग नोंदवत माती, सेंद्रिय खत आणि विविध वनस्पतींच्या बियांचा वापर करून सीडबॉल तयार केले. आगामी पावसाळ्यात हे सीडबॉल विविध मोकळ्या जागांमध्ये टाकून वृक्षसंवर्धन व हरितीकरणाला चालना देण्यात येणार आहे.
उपक्रमाचे नेतृत्व ज्योती रंगदळ आणि सागर गोगे यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे मुलांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा मिळाली.
या उपक्रमास सोसायटीचे अध्यक्ष संजीव सोनार, सचिव डॉ. अमोल उबाळे, कोषाध्यक्ष सीए सचिन तोतला तसेच मिलेनियम पार्कच्या प्रतिनिधी मंडळाने पाठिंबा देत आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आयोजक व सहभागी मुलांचे अभिनंदन करत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पावसाळ्यापूर्वी मिलेनियम पार्क सोसायटीत सीडबॉल निर्मिती उपक्रम उत्साहात
Related Posts
Add A Comment

