महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FPWWV5F8cSJ0EWNLk7P1t3
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने “Framework for Fertilizer Sale” ही डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. याद्वारे शेतकरी मोबाईल ॲपच्या मदतीने आगाऊ खत बुकिंग करू शकतात.
खत बुकिंग कसे कराल?
1. Google Play Store वरून “Framework for Fertilizer Sale” हे ॲप डाउनलोड करा.2
2. आधार OTP, e-KYC किंवा Farmer ID द्वारे पडताळणी पूर्ण करा.
3. आपल्या पिकाची आणि आवश्यक खताची निवड करा.
4. आपल्या परिसरात ज्या विक्रेत्याकडे खत उपलब्ध आहे त्याची निवड करा.
5. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर QR Code किंवा Token नंबर मिळेल.
पहिले बुकिंगचे फायदे
✔️ शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे खत वेळेवर उपलब्ध होते.
✔️ संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व डिजिटल.
✔️ पीक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते.
✔️ दुकानांवरील गर्दी व लांब रांगा टाळता येतात.
✔️ खताचा काळाबाजार व कृत्रिम टंचाई रोखण्यास मदत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकरी प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक पाहण्यासाठीे क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DZRspSzRwfq/
शेतकरी बांधवांनी खतांची गरज भासण्याची वाट न पाहता आजच आगाऊ बुकिंग करून ठेवावे. योग्य वेळी योग्य खत मिळाल्यास उत्पादन वाढते आणि शेतीचा खर्चही नियंत्रित राहतो.
“आधी नियोजन – मग खत खरेदी”
_ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा. शेअर करा आणि इतरांनाही लाभ मिळवून द्या._

